डोंबिवलीत 'या' वेळेत असणार मोठी पाणी कपात
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या जलशुद्दीकरण केंद्रात आणि डोंबिवली विभागातील पाणी वितरण व्यवस्थेसंबंधित दुरूस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या सर्व कामामुळे येत्या मंगळवारी डोंबिवली शहरात जास्त तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जो साधारण सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. अर्थात तब्बल 15 तासांसाठी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम या भागांना पाणी मिळणार नाही.
advertisement
पाणी पुरवठा बंद असण्याच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पाइपलाइन बदलणे आणि वितरण यंत्रणा सुधारण्याचे हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने काही काळ त्रास होणार असला तरी पुढील काळात पाण्याच्या पुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल. मात्र, सुरुवातीच्या काही तासांमध्ये कमी दाबाने पाणी येऊ शकते अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना संयम ठेवण्याची विनंती केली आहे.
