नाशिकहून मुंबईकडे येताना काळाने गाठले
रोहन आणि अवंतिका हे डोंबिवलीतील राहुलनगर परिसरात वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी दोघेही कामानिमित्त इगतपुरी येथे दुचाकीवरून गेले होते. काम झाल्यानंतर ते मुंबईकडे परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर आटगाव परिसरात सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीचा ताबा सुटून दोघेही गंभीर जखमी झाले.
advertisement
अपघातात डोंबिवलीच्या पती-पत्नीचा दुर्दैवी अंत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी त्यांना दोघांनाही मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील वाढते अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
