डोंबिवलीमध्ये विकास म्हात्रे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगला सुळे यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
मंगला सुळे या भाजपाच्या टिळकनगर येथील माजी नगरसेविका होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला रामराम ठोकून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
advertisement
दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 'अनेक विकास कामं हे, विकास मात्रे यांच्या नावात विकास आहे, विकास मात्रे यांच्या पॅनलचं विकास झकास झाल्याशिवाय राहणार नाही. नारळ फोडलेला आहे, या पॅनल साठी जेवढा निधी लागेल नगर विकास खात्याकडून तेवढा विकास निधी दिल्याशिवाय एकनाथ शिंदे हा शांत राहणार नाही. एमआयडीसीकडे दिलेले आहेत. उदय सामंत यांना सांगितलं आहे आता विकास म्हात्रेंकडे ही निधी द्या. मी कधी शब्द दिला तर तो पाळतो. मला बाळासाहेबांची यांची शिकवण आहे. विकास म्हात्रे एक शेर है. डरनेवाला नही लढणे वाला है और लडके जितने वाला है, असं म्हणत शिंदेंनी म्हात्रेंचं कौतुक केलं.
'लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीकडे निशब्द मागतोय. मी गरिबीचे दिवस पाहिले. मुख्यमंत्री झालो आणि मी ठरवलं लाडक्या बहिणीसाठी काहीतरी करायचं त्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला. लाडकी बहिण योजना कधी बंद होणार नाही हा तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. खासदार डॉक्टर आहेत, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो. मी काही लोकांना पोटदुखी आहे. मुख्यमंत्री झालो तरी पोटदुखी उपमुख्यमंत्री झालो तरी पोटदुखी.. बाळासाहेब दवाखाना काढला तरी पोटदुखी आता यांना जमाल गोटा द्या. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून ठेवले आहे म्हणून सगळ्यांना वाऱ्यावरती सोडलं आता त्यांना लोक वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही शिंदेंनी लगावला.
