कोपर स्टेशनवरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी
स्थानिक प्रवासी मंदार टावरे यांनी या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो तत्काळ सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आता हा पूल प्रवाशांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. सध्या पुलावर छताचे काम बाकी असले तरी दिवसा वापरासाठी तो सुरक्षित असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुलाच्या बंद काळात काही प्रवासी वेळ वाचवण्यासाठी थेट रूळ ओलांडत होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत होता. आता पूल सुरू झाल्याने अशा प्रकारच्या घटना थांबतील.
advertisement
पुन्हा एकदा हा पुल करण्यात येणार बंद?
टावरे यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि पायऱ्यांमध्ये बदल करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी दीड महिन्यापूर्वी हा पूल बंद करण्यात आला होता. आता सर्व मुख्य कामे पूर्ण झाली आहेत. केवळ पायऱ्यांवर छत बसवण्याचे काम उरले आहे. सध्या पावसाळा नसल्याने हे काम तातडीने करण्याची गरज नाही. उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून काही महिने बाकी असल्याने दिवसा पूल सुरू ठेवून छताचे काम पुढे केली जाऊ शकते.
त्यांनी रेल्वेला सुचवले की जेव्हा छताचे काम सुरू करायचे असेल तेव्हा पुलावरील प्रवासी कमी असतात त्या वेळेच विशेषतहा हे काम रात्री करावे, त्यामुळे पुन्हा पुल बंद करण्याची आवश्यकता लागणार नाही.
