बॅटच्या वादामुळे मार्केटमध्ये घडली थरारक घटना
सदर घटनेत आरोपींनी जिग्नेशवर लाकडी आणि प्लास्टिकच्या बॅटने वार केले. मारहाण झाल्यानंतर दुकानदार गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
मारहाणीचे नेमके कारण काय?
पोलीसांनी सांगितलेल्या माहितीनुसार मारहाण ही बॅटचे पैसे मागितल्यावर झालेल्या वादातून घडली होती. दरम्यान परिसरातील दुकानात असलेले लोक, ग्राहक आणि आसपासच्या रहिवाशांनी ही घटना पाहून पोलिसांना त्वरित माहिती दिली ज्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला गेला.
advertisement
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपींना ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल. पोलीसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक वाद टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दुकानदार आणि रहिवाशांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.
