11 वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निर्णय
हा खटला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात अनेक वर्षे चालला होता. ज्यात सचिन जयराम सोगीर, मनीष वरकुटे, रमेश पडवळ, कल्पेश पडवळ, कल्पेश घेडगे, मयूर तारमळे, हरेश भोईर आणि कुंडलिक टेंभे अशी आरोपींची नावे होती. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीनुसार किन्हवली पोलिसांनी या आठ जणांवर खूनाच्या प्रयत्नासह भारतीय दंड विधानातील कलम 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
advertisement
साक्षीदारांचे जबाब बदलले आणि संपूर्ण केस उलटली
या खटल्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कुलदीप पडवळ आणि त्याचा भाऊ संदीप या दोन साक्षीदारांची होती. मात्र न्यायालयात त्यांनी आपली पूर्वीची साक्षच बदलली. यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पोलिसांसमोर आणि न्यायालयात दिलेल्या जबाबांमध्ये मोठे फरक दिसून आले होते, त्यामुळे त्यांची साक्ष योग्य मानता येणार नाही
,असे न्यायालयाने स्पष्ट केले. ज्यात दोघांनीच हल्ला झाल्याचे नाकारल्याने संपूर्ण खटल्याला मोठी कलाटणी मिळाली.
वैद्यकीय अहवालाचा तपासून पाहिला असता त्या जखमा आरोपींमुळेच झाल्या होत्या हा सिद्ध करणारा पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही शिवाय या तपासात अनेक त्रुटी असल्याचेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले. सर्वोच्च न्यायालयातील काही निर्णयांचा आधार घेत आणि पुराव्या अभावी आरोपींवर गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आणि आठही जणांची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली.
तसेच मुख्य गुन्हाच सिद्ध झाला नसल्याने या प्रकरणातील फरार आरोपी किरण उखाडे, भिमा इटकर, सतीश जाधव आणि संतोष यादव यांच्यावर पुढील कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
