व्हेज थाळीमध्ये वरण, भात, दोन भाजी, पापड, लोणचं तर नॉनव्हेज थाळीत फिश, मटण, डाळ मुंडी आपल्याला जे हवं ते मिळत त्यामुळे तिथल्या ग्राहकांची मागणी अधिक वाढत आहे. एक महिला म्हणून रांधा वाढा उष्टी काढा एवढंच न करता या सहा महिलांनी दोन वर्षात आपलं अस्तित्व आपली जागा निर्माण केली आहे. ज्या महिला घरातून बाहेर पडायला घाबरायच्या आज त्याच महिला स्टॉल वर पोळीभाजी केंद्र सुरू करते आणि अभिमानात कोणाची नोकर न होता आपल्या हाताला असलेली चव आणि लोकांच्या आवडीनिवडी जपून त्यांना सात्विक जेवण खाऊ घालत असते.
advertisement
त्यामुळे मोहन्यात वैशाली वाघ यांचं पोळीभाजी केंद्र दोन वर्षातच लोकांच्या आवडीचे बनले आहे. केंद्र प्रमुख वैशाली या स्वतः नाचणी, ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या गरम भाकरी, चपाती त्यांच्या स्टॉलवर गरम गरम बनवून देतात. त्यामुळे गरम भाकरी भात आणि ग्राहकांना हवी असलेली भाजी त्या देत असल्याने रोजचे त्यांचे 100 ग्राहक फिक्स आहेत. दुपारी 12 ते 3 पर्यंत यावेळेत स्टॉलवर आपल्याला गर्दी बघायला मिळेल. जेव्हा या महिला स्टॉलवर उभे राहून काम करायला लागल्या तेव्हा त्यांना एक लक्षात आले की घरच्या जेवणाची चव ज्या महिला नोकरी करतात त्यांच्या घरात स्पेशली घरच जेवण मिळत नाही.
आज त्या लोकांना संपूर्ण जेवण हे पंचशील महिला बचत गट पुरवत असतो. आश्चर्यकारक हे आहे की, ज्या महिलेला चूल आणि मूल या गोष्टीच माहिती होत्या आज तीच महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावत काम करते. त्यामुळे मोहन्यात आज ही एकमेव पोळीभाजी केंद्र सुरू झाल्याने अनेकांना घरचं स्पेशली सात्विक अन्न मिळू लागले.