कल्याण : कल्याण रेल्वे परिसरात सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. महावितरणाच्या डीपीला अचानक आल लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली असून स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशनपरिसरात सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून शॉर्ट सर्किटमूळे महावितरणच्या डीपीली अचानक आग लागली होती. अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली पण सकाळची वेळ असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. काही वेळा तारेवर चालत कर्मचारी अग्निशमन दलाला मार्ग दाखवत होते
advertisement
स्थानिकांनी सांगितले की, आगीच्या धुरामुळे स्टेशन परिसरात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर काही जणांनी अग्निशमन दलाच्या कामाची दखल घेत दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग काही वेळातच नियंत्रित करण्यास यश मिळवले. मात्र, या घटनेमुळे स्टेशन परिसरातील वाहतूक आणि प्रवाशांची हालचाल काही तासांसाठी विस्कळीत झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीपीला लागलेली आग तांत्रिक कारणांमुळे झाली असावी, सध्या नुकसानाचे पंचनामे सुरु आहेत. स्टेशन प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षिततेसाठी सूचना दिल्या आहेत.
