कल्याण-डोंबिवलीत शाळेच्या बसगाड्यांवर वाहतूक कोंडीचा फटका
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवलीत 300 पेक्षा जास्त शाळा आहेत, ज्यामध्ये सरकारी तसेच खासगी शाळा दोन्हींचा समावेश आहे. या शाळांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दररोज विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रिक्षा किंवा सहा आसनी कार तसेच बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 8 वाजता सुरू होते. त्यामुळे त्यांना साडेसहा ते सात वाजताच बस पकडावी लागते पण वाहतूक कोंडीमुळे बस वेळेवर पोहोचत नाही.
advertisement
असा निघू शकतो तोडगा
शाळेच्या बसगाड्यांवर सायरन बसवल्यास आणि त्यांना स्वतंत्र मार्गिका मिळाल्यास किंवा वाहतूक पोलिसांनी प्राधान्य दिल्यास विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकतील. एवढेच नाही तर रुग्णवाहिकांना जसे वाहतूक पोलिस वाट मोकळी करून देतात तसंच शाळेच्या बसगाड्यांना देखील प्राधान्य दिले जाणे गरजेचे आहे, असे शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी म्हटले आहे.
वाहतूक कोंडीचे मुख्य कारण म्हणजे काय?
महापालिका क्षेत्रात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे मुख्य कारण म्हणजे मेट्रो काम, पुलाचे काम आणि काही मार्गांवर वाहतूकीत केलेला बदल. कल्याण-मुरबाड मार्गावर विविध शाळा आहेत तसेच कांबा, वरप, म्हारळ या ठिकाणी मोठ्या इंग्रजी माध्यम शाळा आहेत. शहाड पुलाचे काम आणि गोविंदवाडी बायपास 2 रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण काटेमानिवली, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल आणि निळजे पुलावरही वाहतूक त्रासदायक आहे.
