TRENDING:

Kalyan News: ‘मराठी येत नाही का ?’ म्हणत कल्याणमध्ये मद्यपी तरूणांकडून दुकान कर्मचाऱ्यांना मारहाण, खाणावळीत फ्री स्टाईल हाणामारी

Last Updated:

पुन्हा एकदा कल्याणमध्ये, मराठी भाषा बोलण्यावरून दुकानदारामध्ये आणि एका तरूणामध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये मराठी भाषेचा मुद्दा कमालीचा चर्चेत आहे. अनेक ठिकाणी मराठी भाषेवरून फेरीवाल्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद झालेला आपण पाहिलेला आहे. आता अशातच पुन्हा एकदा कल्याणमध्ये, मराठी भाषा बोलण्यावरून दुकानदारामध्ये आणि एका तरूणामध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरामध्ये ही घटना घडली आहे. चक्कीनाका परिसरामध्ये, रिद्धी खाणावळीतील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषा बोलण्यावरून जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला.
Kalyan News: ‘मराठी येत नाही का ?’ म्हणत कल्याणमध्ये मद्यपी तरूणांकडून दुकान कर्मचाऱ्यांना मारहाण, खाणावळीत फ्री स्टाईल हाणामारी
Kalyan News: ‘मराठी येत नाही का ?’ म्हणत कल्याणमध्ये मद्यपी तरूणांकडून दुकान कर्मचाऱ्यांना मारहाण, खाणावळीत फ्री स्टाईल हाणामारी
advertisement

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरामध्ये, रिद्धी खाणावळ आहे. या खाणावळीमध्ये काही नेपाळी लोकं कामाला आहेत. त्यांच्यामध्ये आणि काही तरूणांमध्ये मराठी भाषा बोलण्यावरून वाद झाला. मराठी भाषा येत नाही, या कारणावरून खाणावळीत नशेखोर तरुणांच्या टोळक्याने भयानक तोडफोड केली. तसेच खाणावळीतील दोन कर्मचार्‍यांवर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा (FIR) दाखल केला असून घटनेला 24 तास उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. खाणावळीमध्ये तोडफोड करणारे हे तरूण मद्यपी असल्याचं कळतंय.

advertisement

गेल्या सहा महिन्यांपूर्वी चक्कीनाका परिसरामध्ये, एका व्यक्तीने रिद्धी खाणावळ नावाचं फूड कॉर्नर उघडलं. जिथे चायनीज आणि फास्ट फूड खायला मिळतं. दुकानमालकाचं नाव, संदीप आढाव असं आहे. संदीप यांच्या दुकानात नेपाळी कर्मचारी कामाला आहेत. ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी एक तरूण दुकानात आला. त्याने दुकानातून वडापाव खायला घेतला. त्याच्यात आणि कर्मचार्‍यामध्ये पैशांवरून काही किरकोळ वाद झाला. खाणावळीतील कर्मचारी हिंदीमध्ये बोलत असल्याने त्या तरुणाने कर्मचार्‍याला 'तुला मराठी येत नाही का?' असे विचारले. कर्मचार्‍याने, 'मी काही महिन्यांपूर्वीच नेपाळहून आलो आहे आणि मराठी शिकत आहे,' असे उत्तर दिले. हे ऐकून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या अन्य 3 मित्रांना बोलावून घेतले. हे चौघंही दारूच्या नशेत होते.

advertisement

दुकानातील कर्मचाऱ्याला मराठी येत नसल्यामुळे, नशेत असलेल्या चारही तरूणांनी दुकानाची तोडफोड केली. त्यासोबतच दोन कर्मचाऱ्यांनाही त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करून आणि खाणावळीचे नुकसान करून हे चारही तरुण तेथून पळून गेले. घडलेल्या प्रकारावर दुकान मालकाने संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, " कसेबसे पैसे जमवून 6 महिन्यांपूर्वी आम्ही पैसे गोळा करून हा बिझनेस सुरू केला होता. मी स्वत: मराठी भाषिक आहे, मराठी माणूस व्यवसाय करतोय, त्याला जगू द्या. दुकानामध्ये कर्मचारी नेपाळी आहेत, पण ते मराठी शिकत आहेत. मारहाण करणारे हे तरुण नेहमीच परिसरात गोंधळ घालतात आणि नागरिकांना त्रास देतात. या नशेखोर तरुणांना पोलिसांनी कठोर धडा शिकवायला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणासोबत असे कृत्य करण्याची त्यांची हिंमत होणार नाही."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कॉर्न मॅगी ते चीज कॉर्न पास्ता, मुंबईत इथं फक्त 39 रुपयांपासून घ्या आस्वाद
सर्व पहा

दरम्यान, घटनेला 24 तास उलटून गेले आहेत, तरीही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. घटनेप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्या 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत," असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, घटनेला एवढा वेळ उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही, अशी माहिती आढाव यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News: ‘मराठी येत नाही का ?’ म्हणत कल्याणमध्ये मद्यपी तरूणांकडून दुकान कर्मचाऱ्यांना मारहाण, खाणावळीत फ्री स्टाईल हाणामारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल