नेमका नागरिकांना फायदा होणार?
या अॅपमुळे मनी ऑर्डर पाठवण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली आहे. कोणालाही आपल्या मोबाइलवरून सुरक्षितपणे आणि सहज मनी ऑर्डर पाठवता येईल. इतकेच नव्हे तर पोस्टाच्या विविध योजनांचे हप्ते, विमा पॉलिसीचे हप्ते देखील घरबसल्या या अॅपद्वारे भरता येतात. टपाल विभागाच्या मोहिमेअंतर्गत तयार केलेलं हे अॅप ग्राहकांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलं आहे.
advertisement
'डाक सेवा 2.0' अॅपमध्ये वापरकर्त्यासाठी सोपा इंटरफेस आहे. स्पीड पोस्ट किंवा पार्सल बुक करता येते शिवाय त्याचे ट्रॅकिंग करता येते. पोस्टल विम्यासंबंधित फी भरता येते. ज्यांचे पोस्ट ऑफिस बचत खाते आहे, त्यांना इंटरनेट बँकिंगची सुविधा आणि ई-पासबुक पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या घराजवळचं पोस्ट ऑफिस या अॅपवर शोधता येतं. त्याचबरोबर विविध सेवांचे शुल्क कसे लागतात यासाठी टैरिफ कॅल्क्युलेटरही देण्यात आला आहे.
पोस्टाच्या सेवांमध्ये काही तक्रार असल्यास नागरिकांसाठी खास ‘कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टिम’ या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये सेवा संबंधित तक्रार ऑनलाइन नोंदवता येते आणि तिच्या निवारणाची स्थितीही पाहता येते. एकंदरीत, ‘डाक सेवा 2.0’ मुळे टपाल सेवांचा वापर अधिक आधुनिक, सोपा आणि जलद होणार असून डिजिटल भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
