मलंग गडावर धावली देशातील पहिली 'फ्युनिक्युलर' ट्रॉली
शासनाच्या तपासणीनंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही यासाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मोठा दिलासा देत सुप्रीम कंपनीकडून पहिल्या दोन दिवसांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना विनामूल्य आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
advertisement
हा प्रकल्प आमदार किसन कथोरे यांनी 2004 मध्ये मांडला होता. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला 2012 मध्ये सुरुवात झाली. मात्र विधानसभा क्षेत्राच्या विभाजनानंतर हा प्रकल्प काही काळ रखडला होता. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे नव्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आणि कामाला पुन्हा गती मिळाली.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला बळ मिळाले. आता फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू झाल्याने मलंगगडाचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद होणार आहे.
श्री मलंगगड यात्रेच्या पूर्वसंध्येला ही सेवा सुरू झाल्याने भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार असूनयंदाची यात्रा अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
