TRENDING:

Kalyan News : कल्याणच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून वर्गातच नमाज पठण, व्हिडिओ व्हायरल

Last Updated:

Kalyan News: कल्याणच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी वर्गातच नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या वर्गातील कृतींबाबत चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याण-मलगंगड रोडवरील एका कॉलेजमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला होता. त्यानंतर काही संघटनांनी विरोध दर्शवून संबंधित विद्यार्थ्यांविषयी कारवाईची मागणी केली आहे.
News18
News18
advertisement

प्रकार व्हायरल होताच सर्वत्र संतापाचे वातावरण

कल्याण-मलंगगड रोडवरील भाल गावातील आयडीयल महाविद्यारलयातील हा प्रकार आहे. जिथे महाविद्यालयाच्या रिकाम्या वर्गात साधारण काही मिनिटे विद्यार्थ्यांनी नमाज पठण केलं. मात्र त्याच वेळी कोणीतरी सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावरही व्हायरल केला. मात्र घडले असे की, हे विद्यार्थी मुंबईहून तिथे शिक्षणासाठी येत असतं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हा सह मंत्री रमेश पाटील, संयोजक अमित भोईर आणि सह संयोजक अरूण सावळी, अमित भोईर यांसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेजमध्ये धाव घेतली. त्यानंतर या सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांनी नमाज पठण केले त्याच्याशी या विशषी चर्चाही केली. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितले की,''आम्ही नमाज पठण केले पण यामागे कोणत्याही वादासाठी किंवा धार्मिक भावना भडकवण्याचा आमचा हेतू नव्हता'' असे स्पष्ट त्यांनी सांगितले.

advertisement

विद्यार्थ्यांनी मागितली माफी....

घडलेल्या संपूर्ण घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि उपस्थित कार्यकर्त्यांची माफीही मागितली. पण यानंतर त्यांनी सर्वांना सांगितले शैक्षणिक संस्थेत शिस्त आणि प्रत्येक नियम पाळणे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असून अनिवार्यही आहे. ऐवढेच नाही तर कल्याणमध्ये घडलेली ही धार्मिक कृती संस्थेच्या नियमांमध्ये बसत नसल्याने यानंतर कोणताही विद्यार्थी असे प्रकार करणार नाही, याती पूर्णतहा खबरदारी घेतली जाईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात कमी पाणी पिताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ
सर्व पहा

कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या या नमाज पाठणानंतर त्या विद्यार्थ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले आहे. यात महत्त्वाच्या घटनेत पोलिसांनी कॉलजेमध्ये पोहचून सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी कॉलजे प्रशासनाने पोलिसांना विनंती केली की हा विषय कॉलेज स्तरावर सोडवण्यात यावा.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याणच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून वर्गातच नमाज पठण, व्हिडिओ व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल