कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना एक इसम गावठी बनावट चे पिस्तूल तसेच घातक शस्त्र विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचे पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील यांनी डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवर या इमारतीमध्ये सापळा रचला.
advertisement
यातील आरोपी रोशन झा हा याच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना होती . पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे ,दोन मॅक्झिन, एक खंजीर, दोन चाकू ,दोन तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत.
याप्रकरणी रोशन झा सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात. रोशन विरोधात याआधी देखील उल्हासनगर मधील विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रोशन झा याला स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची देखील माहिती समोर येत आहे . दरम्यान रोशन ने ही शस्त्रे कुठून आणली?कुणाला विकणार होता ?याचा तपास सुरू केला आहे
