TRENDING:

कल्याण- डोंबिवलीत महायुतीचा डंका, भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी समोर

Last Updated:

कल्याण डोंबिवलीत भाजपचे एक-दोन नाही तर तब्बल 15 नगरसेवक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच फेरीत निवडून आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण डोंबिवली : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून सध्या सर्वाधिक चर्चा ही एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील कल्याण- डोंबिवली महापालिकेची आहे. कारण या महापालिकेत एक दोन नाही भाजपचे तब्बल 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. प्रतिस्पर्ध्यांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या उमेदवारांचा विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
News18
News18
advertisement

एकीकडे राज व उद्धव आणि काँग्रेस भाजपा आणि शिवसेनेच्या नावाने टाहो फोडत असताना दुसरीकडे मात्र त्यांचे शिलेदारांनी मैत्री जपून आपल्याच उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावत असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यामुळे निवडणूक निकाल लांब राहिला प्रचार सुरु होण्याआधीच भाजपचे एक-दोन नाही तर तब्बल 15 नगरसेवक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच फेरीत निवडून आलेत. तर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

advertisement

कल्याण डोंबिवलीत गेम कसा फिरला? 

सर्वांत महत्वाची भूमिका बजावली असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चेहरा किंवा मोठं नेतृत्व कल्याण डोंबिवलीत नसल्याने त्यांच्या उमेदावरांनी वैयक्तिक निर्णय घेत भाजपा शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून दिले आहेत.

  भाजपच्या 15 बिनविरोध उमेदवारांची यादी (KDMC BJP Winning Candidate List) 

advertisement

अ.क्र. प्रभाग (वार्ड) / वर्ग उमेदवाराचे पूर्ण नाव आरक्षण / प्रवर्ग
1 २६ ब रंजना मितेश पेणकर सर्वसाधारण महिला
2 २६ क  आसावरी केदार नवरे सर्वसाधारण महिला
3 २७ अ  मंदा सुभाष पाटील ओ.बी.सी. महिला
4 २४ ब ज्योती पवन पाटील सर्वसाधारण महिला
5 १८ अ  रेखा राजन चौधरी ओ.बी.सी. महिला
6 २६ अ मुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकर ओ.बी.सी.
7 २७ ड  महेश बाबुराव पाटील सर्वसाधारण
8 १९ क  साई शिवाजी शेलार सर्वसाधारण
9 २३ अ  दिपेश पुंडलिक म्हात्रे ओ.बी.सी.
10 २३ ड  जयेश पुंडलिक म्हात्रे सर्वसाधारण
11 २३ क  हर्षदा हृदयनाथ भोईर सर्वसाधारण महिला
12 १९ ब सुनिता बाबुराव पाटील सर्वसाधारण महिला
13 १९ अ पूजा योगेश म्हात्रे ओ.बी.सी. महिला
14 ३० अ  रविना अमर माळी ओ.बी.सी. महिला
15 २६ ड मंदार श्रीकांत हळबे सर्वसाधारण

advertisement

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दहा बाय दहाच्या खोलीत सुरू केला व्यवसाय, पोहोचला मॉलपर्यंत, अविनाश यांची कहाणी
सर्व पहा

10 रुपयात नाश्ता, महिलांना 1500 रुपये; काय आहे मुंबईसाठी ज्युनिअर ठाकरेंचा महामेगाप्लान?

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
कल्याण- डोंबिवलीत महायुतीचा डंका, भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल