कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या एक दिवसाआधी उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये शिवसेनेचे ४ उमेदवार विजयी झाली आहे. प्रभाग क्रमाकं २८ अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध विजय झाला आहे. आमदार राजेश मोरे यांचा मुलगा हर्षल मोरे हे आता नगरसेवक झाले आहे. या प्रभागामध्ये सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे हर्षल मोरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
advertisement
तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं आपलं खातं उघडलं आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केलं आहे.
शिवसेना आणि भाजपचे ९ उमेदवार विजयी
तर आतापर्यंत डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे एकूण ९ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पॅनेल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांची बिनविरोध विजयी झाले आहे, तर प्रभाग क्रमांक. 24 मधून भाजपच्या ज्योती पवन पाटील विजय झाल्या आहेत. तर भाजपच्या मंदा सुभाष पाटील प्रभाग क्रमांक 27 मधून बिनविरोध विजयी झाले आहे. कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणूक आत्तापर्यंत भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे, यामध्ये ५ महिलांचा समावेश आहे. तर आता शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. त्यामुळे भाजप-सेनेचे एकूण ९ जण विजयी झाले आहे.
भाजपचे विजयी उमेदवार कोण?
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बुधवारी रेखा राम यादव -चौधरी या प्रप्रभाग क्र. १८ (अ) मधून बिनविरोध विजयी झाल्यात. त्यापाठोपाठ आसावरी केदार नवरे यांची डोंबिवलीतील प्रभाग क्र. २६ (क) मधून बिनविरोध निवड झाली. तर रंजना मितेश पेणकर यांचा प्रभाग क्र. २६ (ब) मधून विजय झाला आहे. या ठिकाणी विरोधात उमेदवार नसल्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने याठिकाणी उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे भाजपचा केडीएमसीमध्ये मतदानाआधीच उमेदवाराचा विजय झाला आहे.
