उड्डाणपूल कधी खुला होणार?
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या काम सुरु आहे. मात्र या पुलाच्या कामाला पुन्हा एकदा उशीर लागणार आहे. नेताजी सुभाष चौक ते बैलबाजार चौक दरम्यान उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल डिसेंबर 2025 अखेर वाहतुकीसाठी खुला होईल असा दावा महापालिका प्रशासन आणि ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र, आता हे उद्दिष्ट साध्य होणार नसून नवीन डेडलाइन 2026मार्च अखेर देण्यात आली आहे.
advertisement
स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये मल्टी लेव्हल पार्किंग प्लाझाचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, उड्डाणपुलाचे काम तसेच कल्याण एसटी डेपोच्या नूतनीकरण आणि पार्किंगसंबंधी प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले आहेत.
स्टेशन परिसरात दिवसभर प्रचंड वर्दळ असल्याने ठेकेदार कंपनीला दिवसा काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे रात्री 12 ते पहाटे 5 या मर्यादित वेळेतच काम सुरू ठेवावे लागत आहे. यामुळे कामावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
