रेल्वेतून पडून काही तासांत मृत्यू...
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रवाशाचे नाव डेव्हिड घाडगे असून ते कल्याणजवळील आंबिवली परिसरात राहतात. त्या दिवशी ते लोकलमधून उतरताना कल्याण रेल्वेस्थानकात पडले होते त्यामुळे ते जखमी झाले होते. डेव्हिड हे जखमी अवस्थेत असताना त्यांना उपचारासाठी कल्याण स्टेशनजवळी रुक्मिणीबाई हॉस्पिटमध्ये दाखले केले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवले. काही तासांनी घरी पोहचताच डेव्हिड यांचा मृत्यू झाला.
advertisement
या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृतदेह रुग्णालयात परत आणला असून जोपर्यंत डॉक्टरांवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत शवविच्छेदनासाठी देणार नाही आणि मृतदेह ताब्यात ठेवणार असल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
रेल्वे अपघातानंतर डॉक्टरांचा निष्काळजीपणा?
डेविड घाडगे यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. मृतदेह रुग्णालयात आणल्यावर डेव्हिड यांचा मुलगा तुषार आणि नातेवाईक गौतम मोरे यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, डॉक्टरांनी जखमी रुग्णाला नीट अॅडमिट करून उपचार केले नाहीत त्यामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कुटुंबीयांना शांत राहण्यास सांगितले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले की, नेमके काय प्रकार घडला आहे याचा योग्य तो तपास नक्कीच केला जाईल आणि त्यानंतर योग्य कारवाईसाठी पावले उचलली जातील.
