रेल्वे कर्मचार्याकडून लाच घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव हरिश कांबळे असं आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश कांबळे स्वतः रेल्वे व्हिजिलन्स इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करत होता. संबंधित बुकिंग क्लार्कचे रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात अडकलेले पैसे काढून देतो, असे आमिष दाखवत त्याने तब्बल ६० हजार रूपयांची मागणी केली होती. संपूर्ण प्रकरणाची माहिती रेल्वे व्हिजिलन्स विभागाला मिळाली. रेल्वे व्हिजिलन्स विभागाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाईचे पाऊल उचलले. व्हिजिलन्स पथकाने सापळा रचून बुकिंग क्लार्ककडून 20 हजार रुपये स्वीकारण्याचा कट रचला होता.
advertisement
ठरल्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी हरिशला घेराव घातला आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे 20 हजार रुपये घेऊन एक माणूस पाठवला. आरोपीने रक्कम स्वीकारताच पोलिसांची खात्री पटली. लगेचच व्हिजिलन्स पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर हरीश कांबळेला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पुढची चौकशी सुरू असून, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. दुपारच्या 02:45 च्या सुमारास हरिषला जीआरपी कल्याण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याने आणखी कोणाकोणाला फसवले आहे का किंवा या मागे मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना अशा कोणत्याही तोतया व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
