निरागस चिमुकल्यासमोर रंगलं हत्याकांड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा चालक म्हणून काम करत होता, तर विद्या टाटा मोटर्स कंपनीत कार्यरत होती. या दोघांना दोन मुले असून काही दिवसांपासून संतोष याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होते. गुरुवारी रात्री सुमारास दहा वाजताच्या दरम्यान या वादाला धक्कादायक रुप प्राप्त झाले. संतोषने संतापाच्या भरात धारदार चाकू घेऊन पत्नीवर हल्ला केला आणि तिचा गळा चिरून तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पत्नीचा गळा चिरल्यानंतर स्वतःच्याही जिवावर उठला पती
घडलेल्या घटनेनंतर संतोषने त्याच चाकूने स्वतःच्या अंगावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड ऐकून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी अवस्थेत संतोष आणि विद्या यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विद्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, संतोषची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात संतोष पोहळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
