TRENDING:

Kalyan Wedding News: लग्नाआधी मोठा अनर्थ, हळदीचा सोहळा ठरला विषारी; जेवणातून 50 जणांना विषबाधा, विवाह रद्द, नवरीला मानसिक धक्का

Last Updated:

Kalyan Wedding Shocking News: कल्याण पश्चिमेमध्ये मोहन प्राईड या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये हळदी समारंभाच्या जेवणामध्ये काही पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. वधूच्या कुटुंबियांनी कॅटरर्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण पश्चिमेमध्ये एका धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेमध्ये मोहन प्राईड या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये हळदी समारंभाच्या जेवणामध्ये काही पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. वधूच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये 40 ते 50 नातेवाईकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर आता लग्न रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. वधूकडील लोकांनी कॅटरर्सच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कल्याण पश्चिमेमध्ये खळबळ उडाली असून अनेक नागरिकांकडून सध्या सावधगिरीचा इशारा घेतला जात आहे.
News18
News18
advertisement

कल्याण पश्चिमेमध्ये मोहन प्राईड या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये राहणाऱ्या संजित बाविस्कर यांच्या मुलीचं आज (18 जानेवारी) लग्न होतं. पण हळदीच्या दिवशी अपरिचित घडल्यामुळे वधूच्या वडिलांना आपल्या लेकीचं लग्न रद्द करावा लागलं आहे. लग्न रद्द झाल्याने वधूला मोठा मानसिक धक्का बसला आहे. हळदीच्या जेवणामध्ये विषबाधा झाल्यामुळे वधूच्या कुटुंबियांकडून संबंधित कॅटरर्सवर गुन्हा दाखल करुन त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. विषबाधा झालेल्यांवर कल्याण पश्चिमेतील वेगवेगळ्या हॉस्पिटल्सध्ये उपचार सुरु आहेत.

advertisement

वधूच्या वडीलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कॅटरर्सचा मालक राज विलास पराते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (17 जानेवारी) हळदीचा समारंभ होता. यामध्ये वधुकडील पाहुणे मंडळी जेवत होते. जेवल्यानंतर घरी परतल्यानंतर अचानक 40 ते 50 जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. ज्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला आहे, त्यांना कल्याणसह, अंबरनाथ आणि मुरबाडच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर घसरले, कांदा आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

वधूकडील नातेवाईकांसोबतच कॅटरर्सच्या काही लोकांनाही विषबाधा झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हळदीच्या जेवणामध्ये विषबाधा झालेल्यांमध्ये वधूची आई रेखासोबत त्यांच्या बहिणीचाही समावेश आहे. वधूला या घटनेचा जबर मानसिक धक्का बसल्याने आजचे लग्न रद्द करण्याची वेळ बाविस्कर कुटुंबियांवर आली आहे. वधूचे वडिल संजित बाविस्कर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. कॅटरर्सविरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याणसह आजूबाच्या शहरांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan Wedding News: लग्नाआधी मोठा अनर्थ, हळदीचा सोहळा ठरला विषारी; जेवणातून 50 जणांना विषबाधा, विवाह रद्द, नवरीला मानसिक धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल