TRENDING:

KDMC : कल्याण-डोंबिवलीत मनसेचं इंजिन सुस्साट, भाजपचं अख्ख घराणं फोडलं, नवरा-बायको-पोरीलाही उमेदवारी!

Last Updated:

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे माजी नगरसेवक दाम्पत्यांला आणि त्यांच्या मुलीला मनसेने उमेदवारी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्याच पक्षाचे उमेदवार, कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान एबी फॉर्म वाटपावरून महायुतीमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. काही इच्छुकांनी तर थेट मनसेकडूनच एबी फॉर्म आणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काही ठिकाणी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्याने एकच खळबळ माजली आहे.
कल्याण-डोंबिवलीत मनसेचं इंजिन सुस्साट, भाजपचं अख्ख घराणं फोडलं, नवरा-बायको-पोरीलाही उमेदवारी!
कल्याण-डोंबिवलीत मनसेचं इंजिन सुस्साट, भाजपचं अख्ख घराणं फोडलं, नवरा-बायको-पोरीलाही उमेदवारी!
advertisement

भाजपच्या पती-पत्नी-मुलीला मनसेची उमेदवारी

मनसेने शेवटच्या क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली, या यादीमध्ये भाजप-शिवसेनेच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छुकांना एबी फॉर्म दिले. या यादीमधील सगळ्यात महत्त्वाचे नाव म्हणजे भाजपचे माजी दिग्गज नगरसेवक शैलेश धात्रक आणि दिग्गज माजी नगरसेविका मनिषा धात्रक. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने धात्रक दाम्पत्याने मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढच नाही तर मनसेने धात्रक दाम्पत्याची मुलगी पूजा धात्रक यांनाही उमेदवारी दिली आहे. धात्रक दाम्पत्य हे दोन टर्म भाजपचे नगरसेवक राहिले आहेत.

advertisement

मनसेची 49 उमेदवारांची यादी

अ.क्र. उमेदवाराचे नाव प्रभाग क्रमांक
1 सौ. पुजा दिपेश फुलवडे १ ब
2 श्री. सचिन मनोहर शिंदे १ ड
3 श्री. सुजीत आनंद जाधव २ अ
4 श्री. उल्हास महादेव भोईर २ ड
5 सौ. ज्योती आभाळे ३ अ
6 श्री. भूषण जाधव ३ ड
7 श्री. पवन नारायण भोसले ५ अ
8 सौ. रेखा उल्हास भोईर ५ क
9 श्री. गणेश लांडगे ७ ड
10 सौ. नयना प्रकाश भोईर ७ अ
11 सौ. उर्मिला तांबे ९ क
12 सौ. सोनल कपिल पवार ९ ब
13 श्री. अनिकेत उदय गायकवाड ११ क
14 विद्या योगेश गव्हाणे ११ ब
15 श्री. प्रभाकर वामन गायकवाड १५ क
16 सौ. शितल महेश भंडारी १५ ब
17 श्री. आनंता चंदर गायकवाड १५ ड
18 सौ. स्नेहा सुनिल राणे १६ क
19 श्री. सुनिल गणपत राणे १६ ड
20 सौ. करुणा मिलिंद झाल्टे १८ ब
21 श्री. महेंद्र पुंजा कुंदे १८ क
22 काजल जयंता पाटील १९ ब
23 श्री. जयंता दत्तू पाटील १९ ड
24 श्री. प्रल्हाद परशुराम म्हात्रे २१ अ
25 ॲड. वेदांगी प्रल्हाद म्हात्रे २१ ब
26 सौ. आशा प्रेमराज पाटील २१ क
27 श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील २२ अ
28 सौ. रसिका संदेश पाटील २२ ब
29 श्री. कदम गजानन भोईर २२ ड
30 सौ. निलम हेमंत दाभोळकर २४ क
31 श्री. अश्विन ब्रम्हा पाटील २४ ड
32 श्री. शैलेश रमेशचंद्र धात्रक २५ अ
33 सौ. मनिषा शैलेश धात्रक २५ ब
34 पुजा शैलेश धात्रक २५ क
35 श्री. प्रतिक पोपटलाल मारु २६ क
36 सुवर्णा संजय पाटील २७ अ
37 सौ. लिना अमोल पाटील २७ ब
38 ॲड. मनोज प्रकाश घरत २७ ड
39 श्री. समीर रोहिदास भोर २८ ड
40 श्री. विशाल बढे २९ क
41 ॲड. रसिका महेश कोस्तेकर २९ ब
42 सौ. वैशाली योगेश पाटील ३० अ
43 सौ. वैशाली योगेश पाटील ३० ब
44 श्री. योगेश रोहिदास पाटील ३० क
45 श्री. योगेश रोहिदास पाटील ३० ड
46 श्री. तकदीर काळण ३१ अ
47 सौ. ज्योती रक्षित गायकर ३१ ब
48 सौ. योगिता तकदीर काळण ३१ क
49 श्री. निवृत्ती चंद्रकांत पाटील ३१ ड

advertisement

कोण किती जागांवर लढणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत, यात मनसे 49 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 73 जागांवर लढणार आहे. महायुतीमध्ये मात्र शिवसेना-भाजप किती जागांवर लढणार? याची अंतिम अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही. नाराजांची बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर न करताच थेट एबी फॉर्म दिल्याची चर्चा रंगली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC : कल्याण-डोंबिवलीत मनसेचं इंजिन सुस्साट, भाजपचं अख्ख घराणं फोडलं, नवरा-बायको-पोरीलाही उमेदवारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल