युती धर्म पाळून भाजपला अडीच वर्ष महापौरपद द्यावं, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत महापौरपद हे फक्त शिवसेनेकडे होतं. आता भाजपने कल्याण-डोंबिवलीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर महापौरपदासाठी 50-50 चा फॉर्म्युला अवलंबला जावा, अशी मागणी केली आहे.
कल्याण-डोंबिवलीचे आकडे
कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागांपैकी सध्या शिवसेनेने 36 जागांवर तर भाजपने 25 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 आणि मनसेला 3 जागांवर विजय मिळाला. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे अजून एकही जागेवर आघाडी मिळालेली नाही. 122 जागांच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 62 जागांची गरज आहे. भाजप-शिवसेनेने आताच 61 जागा जिंकल्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार, हे स्पष्ट झालं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदानाआधीच भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 7 असे 22 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले, त्यामुळे पहिलं मत पडण्याच्या आधीच या निवडणुकीची चुरस जवळपास संपल्यात जमा होती.
advertisement
