कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 122 जागांवर सध्या शिवसेना 12 जागांवर विजयी झाली आहे तर त्यांचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. शिवसेनेची सध्याची आघाडी ही 40 आहे. तर भाजप 8 जागांवर विजयी झाली असून त्यांचे 16 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यासह भाजप कल्याण-डोंबिवलीमध्ये 22 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवेसना 2 जागांवर विजयी झाली आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली एकूण जागा 122
भाजप-17
शिवसेना- 9
शिवसेना उबाठा- 2
काँग्रेस-00
मनसे-2
इतर-00
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, याची घोषणा निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या केली नसली, तरी या 22 जणांचा विजय निश्चित मानला जात आहे, कारण या उमेदवारांच्याविरोधात विरोधी पक्षामधल्या कुणीच उमेदवार दिला नाही किंवा त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण 52.11 टक्के मतदान पार पडलं आहे.
2015 मध्ये कुणाचा विजय?
याआधी कल्याण-डोंबिवलीमध्ये 2015 साली निवडणूक झाली होती, ज्यात शिवसेनेचा 52 जागांवर तर भाजपचा 42 जागांवर विजय झाला होता. याशिवाय मनसेला 9, काँग्रेसला 4, एमआयएमला 4, राष्ट्रवादीला 2 आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर विजय मिळाला होता.
