पॅनल 21 अ मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, 21 ब मधून भाजपच्या डॉ. रविना राहुल म्हात्रे आणि 21 क मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेखा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. हे तिघेही एकाच कुटुंबातील असूनही वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढले होते. म्हात्रे कुटुंबामध्ये प्रल्हाद म्हात्रे हे दीर, रेखा म्हात्रे या भावजय आणि रविना म्हात्रे या सूनबाई आहेत. आता हे तिघेही वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवक म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसणार आहेत.
advertisement
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना सध्या 12 जागांवर विजयी झाली आहे, तर 6 जण बिनविरोध निवडून आले असून 40 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. तर भाजपचा आतापर्यंत 8 जागांवर विजय झाला असून त्यांचे बिनविरोध 16 उमेदवार निवडून आले आहेत. 22 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. मनसेचे 2 उमेदवार जिंकले असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.
दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला अजून एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 7 नगरसेवक हे आधीच बिनविरोध निवडून आले होते, त्यामुळे पहिलं मत पडण्याच्या आधीच महायुती 22 जागांनी आघाडीवर होती.
