मनसेने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीमधील नवनिर्वाचित नगरसेवक आणि ठाकरे सेनेचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आज मुंबईत येऊन मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नवीन नगरसेवकांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं. या भेटीनंतर गटनेते उमेश बोरगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
advertisement
"आम्ही सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. पुढील वाटचाल कशी असायला पाहिजे या संदर्भात चर्चा केली आणि साहेबांनी मार्गदर्शन केलं. जर पाठिंबा बाबत कोणी विचारला आणि सन्मानपूर्वक असेल विचार केला जाईल. महायुती पाठिंबा मागत आहे . भाजपकडून काय प्रस्ताव येतोय ते पाहू. सन्मानपूर्वक सगळ्या गोष्टी झाल्या तर विचार करू, अशी प्रतिक्रिया गटनेचे उमेश बोरगावकर यांनी दिली.
तसंच,"भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना संपर्क करण्यात येत आहे. जो काही प्रस्ताव येईल, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. काही जण आमच्या संपर्कात नाही. जे नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल' असंही बोरगावकरांनी स्पष्ट सांगितलं.
