केडीएमसीच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेचे उमेदवार संपत्तीच्या बाबतीतही आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार वरुण पाटील हे निवडणुकीत उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहेत. वरुण पाटील यांची एकूण संपत्ती तब्बल 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 रुपये एवढी आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला त्याच्या संपत्तीचा तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करावा लागतो, त्यानुसार सर्व उमेदवारांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.
advertisement
| उमेदवार | पक्ष | एकूण संपत्ती |
| वरुण पाटील | भाजप | 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 |
| श्यामल गायकर | भाजप | 26 कोटी 74 लाख 69 हजार 944 |
| महेश पाटील | भाजप | 26 कोटी 36 लाख 47 हजार 609 |
| विक्रांत शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस | 17 कोटी 85 लाख 42 हजार |
| हेमा पवार | भाजप | 15 कोटी 29 लाख 29 हजार 290 |
| ज्योती मराठे | शिवसेना | 13 कोटी 51 लाख 44 हजार 468 |
| सचिन पोटे | शिवसेना | 12 कोटी 49 लाख 4 हजार 214 |
| राहुल दामले | भाजप | 12 कोटी 14 लाख 68 हजार 604 |
| मल्लेश शेट्टी | शिवसेना | 10 कोटी 36 लाख 42 हजार 941 |
| निलेश शिंदे | शिवसेना | 8 कोटी 59 लाख 76 हजार 733 |
| जयेश म्हात्रे | भाजप | 7 कोटी 3 लाख 32 हजार 722 |
| दीपेश म्हात्रे | भाजप | 6 कोटी 33 लाख 88 हजार 766 रुपये |
| विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे | शिवसेना | 4 कोटी 47 लाख |
| सूरज मराठे | शिवसेना | 1 कोटी 83 लाख 89 हजार 341 |
| हर्षल मोरे | शिवसेना | 52 लाख 14 हजार 322 |
सगळ्यात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपच्याच श्यामल गायकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. श्यामल गायकर यांची संपत्ती 26 कोटी 74 लाख 69 हजार 944 रुपये एवढी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचेच महेश पाटील आहेत, त्यांची संपत्ती 26 कोटी 36 लाख 47 हजार 609 रुपये आहे. महेश पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांची संपत्ती 15 कोटी 29 लाख 29 हजार 290 रुपये आहे.
शिवसेना उमेदवार ज्योती मराठे यादेखील बिनविरोध निवडणूक जिंकल्या आहेत, त्यांची एकूण संपत्ती 13 कोटी 51 लाख 44 हजार 468 रुपये आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत शिंदे यांची संपत्ती 17 कोटी 85 लाख 42 हजार 779 रुपये आहे.
