भाजपचा तिसरा उमेदवार विजयी
रंजना पेणकर यांच्याआधी प्रभाग क्रमांक 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून दोन्ही विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं.
हा विजय हिंदुत्वाचा असून मी तो पक्षश्रेष्ठींना समर्पित करते. आता महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करणार, अशी प्रतिक्रिया रेखा चौधरी यांनी दिली आहे. महिला म्हणून मला खूप काम करायचं आहे. रुग्णालय, आरोग्य व्यवस्था व्यवस्थित करायची आहे. पॅनल सिस्टिम होती म्हणून मला भीती वाटली होती, मात्र आता मी मोकळी झाली आहे. महायुतीच्या इतर उमेदवारांचा प्रचार मी करणार आहे, असं रेखा चौधरी यांनी सांगितलं आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तसंच 16 जानेवारीला मतमोजणी होईल. 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, तर आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली गेली. 2 जानेवारीपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, त्यामुळे आता सगळेच राजकीय पक्ष बंडखोरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये 122 जागांसाठी मतदान होत आहे, यात भाजप-शिवसेना महायुतीसमोर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेच्या युतीचं आव्हान आहे.
