TRENDING:

KDMC Elections : कल्याण-डोंबिवलीमध्ये 'इंजिन' यार्डातून सुटलं, मनसे उमेदवाराने भरला पहिला फॉर्म!

Last Updated:

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेने पहिला फॉर्म भरत प्रचाराचा नारळ फोडला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष हळूहळू उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी कोणतेच राजकीय पक्ष सर्व उमेदवारांची घोषणा करत नाहीयेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेने पहिला फॉर्म भरत प्रचाराचा नारळ फोडला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती झाली आहे. 122 पैकी 54 जागांवर मनसे आणि 68 जागांवर शिवेसना लढणार आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये 'इंजिन' यार्डातून सुटलं, मनसे उमेदवाराने भरला पहिला फॉर्म!
कल्याण-डोंबिवलीमध्ये 'इंजिन' यार्डातून सुटलं, मनसे उमेदवाराने भरला पहिला फॉर्म!
advertisement

मनसेने प्रभाग 30 मधून योगेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे, यानंतर योगेश पाटील हे मनसेचे फॉर्म भरलेले पहिले उमेदवार ठरले. मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये योगेश पाटील यांनी मनसेकडून फॉर्म भरला. प्राथमिक स्वरुपात आम्ही एक फॉर्म भरत आहोत, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे हा विचार आहे

advertisement

'तुम्ही सगळे ठाकरे ब्रॅण्ड म्हणता, पण ठाकरे हा विचार आहे, तो कुणीही संपवू शकत नाही. कोणाचा बाप आला तरी संपवू शकत नाही. आम्ही ब्रॅण्ड म्हणून नाही तर विचारांचे पाईक आहोत. तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मराठी माणसासाठी जे करायचं, ते आम्ही सतत करत असतो. मराठी माणसासाठी आम्ही सतत झगडत असतो', असं राजू पाटील म्हणाले.

advertisement

'यांच्या विकासाच्या संकल्पना काय आहेत, मला माहिती नाही. मात्र आमच्या निश्चितच संकल्पना आहेत. आमचे नगरसेवक निवडून येतील, अशी मला आशा आहे. आमचा महापौर बसला तर आम्हाला शहरासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळेल', असं वक्तव्य राजू पाटील यांनी केलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं ठिकाण, 40 दिवस चालते यात्रा, हंडी मटण खाण्यासाठी असते गर्दी
सर्व पहा

'14 गावांच्या पॅनलमध्ये तसंच दिव्यामध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत. आमची युती आहे, एखाद दुसऱ्या जागेवर काही अडत असेल तर त्यातून आम्ही मार्ग काढू. चांगल्याप्रकारे निवडणुकीला सामोरे जात आहोत. दिव्यात आम्ही तीन पॅनलमध्ये पाच जागा मागितल्या आहेत, तिथे एक-दोन जागांवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. दिव्यात शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांना तिकीट दिले गेले आहे, त्यामुळे भाजपमधील होतकरू पोरं आणि इच्छुक उमेदवार माझ्या संपर्कात आहे', असा दावाही राजू पाटील यांनी केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Elections : कल्याण-डोंबिवलीमध्ये 'इंजिन' यार्डातून सुटलं, मनसे उमेदवाराने भरला पहिला फॉर्म!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल