TRENDING:

KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे-फडणवीसांना धक्का, राज ठाकरेंनी गेम फिरवला, मनसेच्या उमेदवारांची पूर्ण यादी!

Last Updated:

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी अखेर समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुती विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीचा सामना होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत, पण कोणत्याच पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नाही. नाराजांची बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांनी ही रणनिती अवलंबल्याचं बोललं जात आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिंदे-फडणवीसांना धक्का, राज ठाकरेंनी गेम फिरवला, मनसेच्या उमेदवारांची पूर्ण यादी!
कल्याण-डोंबिवलीत शिंदे-फडणवीसांना धक्का, राज ठाकरेंनी गेम फिरवला, मनसेच्या उमेदवारांची पूर्ण यादी!
advertisement

शिवसेना-भाजपच्या नाराजांना मनसेचा एबी फॉर्म

दुसरीकडे मनसेने थेट कल्याण-डोंबिवलीमधल्या शिवसेना भाजप महायुतीतल्या शिवसेना-भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांनाच थेट एबी फॉर्म दिले आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे. भाजपचे दोन दिग्गज माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि आणि मनिषा धात्रक यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही मनसेने उमेदवारी दिली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेच्या 49 उमेदवारांची यादी समोर आली आहे, ज्यांनी एबी फॉर्म भरले आहेत. मनसेची 49 जागांची यादी समोर आल्यामुळे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना 73 जागांवर लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

advertisement

मनसेची 49 उमेदवारांची यादी

अ.क्र. उमेदवाराचे नाव प्रभाग क्रमांक
1 सौ. पुजा दिपेश फुलवडे १ ब
2 श्री. सचिन मनोहर शिंदे १ ड
3 श्री. सुजीत आनंद जाधव २ अ
4 श्री. उल्हास महादेव भोईर २ ड
5 सौ. ज्योती आभाळे ३ अ
6 श्री. भूषण जाधव ३ ड
7 श्री. पवन नारायण भोसले ५ अ
8 सौ. रेखा उल्हास भोईर ५ क
9 श्री. गणेश लांडगे ७ ड
10 सौ. नयना प्रकाश भोईर ७ अ
11 सौ. उर्मिला तांबे ९ क
12 सौ. सोनल कपिल पवार ९ ब
13 श्री. अनिकेत उदय गायकवाड ११ क
14 विद्या योगेश गव्हाणे ११ ब
15 श्री. प्रभाकर वामन गायकवाड १५ क
16 सौ. शितल महेश भंडारी १५ ब
17 श्री. आनंता चंदर गायकवाड १५ ड
18 सौ. स्नेहा सुनिल राणे १६ क
19 श्री. सुनिल गणपत राणे १६ ड
20 सौ. करुणा मिलिंद झाल्टे १८ ब
21 श्री. महेंद्र पुंजा कुंदे १८ क
22 काजल जयंता पाटील १९ ब
23 श्री. जयंता दत्तू पाटील १९ ड
24 श्री. प्रल्हाद परशुराम म्हात्रे २१ अ
25 ॲड. वेदांगी प्रल्हाद म्हात्रे २१ ब
26 सौ. आशा प्रेमराज पाटील २१ क
27 श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील २२ अ
28 सौ. रसिका संदेश पाटील २२ ब
29 श्री. कदम गजानन भोईर २२ ड
30 सौ. निलम हेमंत दाभोळकर २४ क
31 श्री. अश्विन ब्रम्हा पाटील २४ ड
32 श्री. शैलेश रमेशचंद्र धात्रक २५ अ
33 सौ. मनिषा शैलेश धात्रक २५ ब
34 पुजा शैलेश धात्रक २५ क
35 श्री. प्रतिक पोपटलाल मारु २६ क
36 सुवर्णा संजय पाटील २७ अ
37 सौ. लिना अमोल पाटील २७ ब
38 ॲड. मनोज प्रकाश घरत २७ ड
39 श्री. समीर रोहिदास भोर २८ ड
40 श्री. विशाल बढे २९ क
41 ॲड. रसिका महेश कोस्तेकर २९ ब
42 सौ. वैशाली योगेश पाटील ३० अ
43 सौ. वैशाली योगेश पाटील ३० ब
44 श्री. योगेश रोहिदास पाटील ३० क
45 श्री. योगेश रोहिदास पाटील ३० ड
46 श्री. तकदीर काळण ३१ अ
47 सौ. ज्योती रक्षित गायकर ३१ ब
48 सौ. योगिता तकदीर काळण ३१ क
49 श्री. निवृत्ती चंद्रकांत पाटील ३१ ड

advertisement

कल्याण-डोंबिवलीमध्ये कुणाची सत्ता?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीपासून मिळेल संरक्षण, हिवाळ्यात खा विड्याचे पान, आणखी फायदे कोणते?
सर्व पहा

याआधी 2015 साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती, त्यात शिवसेनेला 52, भाजपला 42, मनसेला 9, काँग्रेसला 4, एनसीपीला 2, एमआयएमला 1 तर इतर आणि अपक्षांना 12 जागा मिळाल्या होत्या, पण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर कल्याण-डोंबिवलीमधले बहुतेक सगळेच नगरसेवक हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे गेले, त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कुणाची सत्ता येणार? याचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. 15 जानेवारीला कल्याण-डोंबिवली सह 29 महापालिकांच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे-फडणवीसांना धक्का, राज ठाकरेंनी गेम फिरवला, मनसेच्या उमेदवारांची पूर्ण यादी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल