ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीशिवाय बहुमत गाठणं अशक्य बनल्यानं, आता नगरसेवकांची पळवापळव सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याणमधून विजयी झालेले नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन्ही नगरसेवक नॉटरिचेबल आहेत. त्यानंतर आता आणखी तीन नगरसवेकांशी संपर्क तुटला असून ठाकरेंचे तब्बल 5 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले पाच नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता पक्षानं या ॉ नगरसेवकांवर कारवाईची तयारी सुरू केलीय. तर मनसेच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवल्याची माहिती आहे. आरक्षण जाहीर होताच महापौर बसवण्यासाठी हालचालींना वेग आला असून त्या आधी जुळवा जुळव केली जात आहे. उबाठाचे बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेचे बंडखोर आहे.
advertisement
उबाठाच्या नगरसेवकांचं महत्त्व का वाढलं?
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तेचं गणित बिकट बनलंयम त्याला कारण म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांची संख्या आहे. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्येत जास्त फरक नाही. कल्याण डोंबिवलीत 122 नगरसेवकांपैकी शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याखालोखाल भाजपचे 50 नगरसेवक विजयी झाले आहेत. सत्ता स्थापनेसाठी 62 हा जादूई आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेना उबाठाचे 11 तर मनसेचे 5 या 16 नगरसेवकांचं महत्व वाढलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत आपलाच महापौर बसावा म्हणून भाजप-शिवसेनेकडून जोरदार मोर्चेंबांधणी सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून बहुमताचा आकडा जुळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सत्तेचं गणित जुळवण्याचे कोण-कोणते पर्याय यावर नजर टाकूया...
शिवसेना-भाजप समोर कोण कोणते पर्याय?
शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करु शकतात. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून शिंदेंची शिवसेना शकतात. शिंदेंच्या शिवसेने 53 आणि शिवसेना उबाठाचे 11 असे मिळून त्यांना 64 हा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो.
मित्राला शह देण्यासाठी कोण ठाकरेंची मदत घेणार?
सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक झालेल्या कल्याण-डोंबवली महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजप-शिवसेनेतील या संघर्षामुळं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे केडीएमसीत किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत.. त्यामुळं आपल्या मित्राला शह देण्यासाठी कोण ठाकरेंची मदत घेतं? ठाकरे भाजपला साथ देतात की शिंदेंचा हात हाती घेतात? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
