TRENDING:

सण साजरा करायला जाताय? आधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; गुढीपाडव्यादिवशी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक

Last Updated:

central railway mega block : मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. अनेक गाड्यांचं वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. नेमका हा ब्लॉक कधी असेल याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशीच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
मध्य रेल्वेकडून टिटवाळा–आसनगावदरम्यान मध्यरात्री ब्लॉक
मध्य रेल्वेकडून टिटवाळा–आसनगावदरम्यान मध्यरात्री ब्लॉक
advertisement

टिटवाळा-आसनगाव दरम्यान मध्यरात्री खोळंबा

मध्य रेल्वेवरील टिटवाळा आणि आसनगावदरम्यान आज अर्थात बुधवारी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या सर्वांमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक?

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार मध्यरात्रीच्या 2 वाजून 10 मिनिटांनी ते 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अयोध्या- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला वाशिंद येथए 2 वाजून 27 मिनिटांपासून रात्री 2 वाजून 50 पर्यंत थांबवण्यात येणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

तसेच शालिमार-लोकलमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला आसनगाव येथे रात्री 2 वाजून 37 पासून ते रात्री 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत तर हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला आटगाव येथे रात्री 2 वाजून 38 मिनिटांपासून रात्री 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत थांबण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्यांना साधारण 20 ते 25 मिनिटांचा विलंब होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
सण साजरा करायला जाताय? आधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; गुढीपाडव्यादिवशी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल