अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आल्याने गावकरी घाबरलेल्या अवस्थेत आहेत .या बिबट्याने दोन शेळ्यांना खाऊन त्यांचा पडशा पडलाय. मानवी वस्तीत हा बिबट्या आल्याने गावकऱ्यांमध्ये मोठ्या दहशतीचं वातावरण आहे. सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडायला गावकरी भित आहेत. सध्या वनविभागाने या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे शिवाय ज्या ठिकाणी बिबट्याने शेळ्या खाल्ल्या आहेत. त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. जेणेकरून या बिबट्याच्या हालचाली कॅमेरात कैद होतील आणि त्याला पकडणे शक्य होईल. शिवाय, गावाकऱ्यांनी गावातल्या नागरिकांना टोळीने फिरण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, लहान मुलांना एकटं न पाठवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वी, डोंबिवलीतील हाय प्रोफाईल लोढा खोणी पलावा बिल्डींगच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला होता. या परिसरामध्ये, इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला होता. जेसीबीने काम करत असताना जेसीबी ड्रायव्हरला बिबट्या दिसला होता. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर होता त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरच परिसरातील दोन मोठ्या शाळा होत्या. त्यामुळे पालकांसह, शाळा प्रशासन आणि स्थानिक शासनामध्येही भितीचे वातावरण पसरले होते. रहदारीच्या परिसरामध्ये आणि शहरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागरी वस्तीमध्ये, बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागानंतर आता शहरातही बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. बिबट्या शिकारीच्या शोधात असल्यामुळे तो रहिवाशी वस्तीमध्ये आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोढा खोणी पलावा भागापासून मलंगगडचा जंगलपट्टा बराचसा लांब आहे. तरीही एवढ्या लांब बिबट्या शिकारी करता आल्याने नागरी वस्तीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
