वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले असून बिबट्यांना पकडण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये, वन विभागाकडून पिंजरे लावून बिबट्यांना पकडले जात आहे. डोंबिवलीमधील हाय प्रोफाईल लोढा खोणी पलावा बिल्डींगच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या परिसरामध्ये, इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला आहे. जेसीबीने काम करत असताना जेसीबी ड्रायव्हरला बिबट्या दिसला आहे. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरच परिसरातील दोन मोठ्या शाळा आहेत.
advertisement
रहदारीच्या परिसरामध्ये आणि शहरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्तीमध्ये, बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागानंतर आता शहरातही बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. बिबट्या शिकारीच्या शोधात असल्यामुळे तो रहिवाशी वस्तीमध्ये आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोढा खोणी पलावा भागापासून मलंगगडचा जंगलपट्टा बराचसा लांब आहे. तरीही एवढ्या लांब बिबट्या शिकारी करता आल्याने नागरी वस्तीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला आवर कसा घालायचा याबाबत नामी उपाय सांगितला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वाढलेल्या बिबट्याच्या संख्येबाबत बोलताना म्हटले की, यावर नसबंदी हा पर्याय आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुंबईत सुद्धा अशा गोष्टी घडत होत्या. 2014 नंतर मुंबईत आतापर्यंत अशा घटना घडल्या नाहीत. मी वनमंत्री असताना उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. दुसरा बिबट सफारी हा मार्ग आहे, मी केली होती. काही ठिकाणी बिबटे मागितले असतील तर दिले पाहिजे. बिबटे रेस्क्यू करण्यासाठी काही लोक मानधनावर नियुक्त करण्याची योजना आहे, मात्र आता त्यासाठी निधी नाही. निधी उपलब्ध केला पाहिजे.
