कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात दोन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरीची जाहिरात केली जाणार आहे. लॉटरी नंतर एप्रिल-मे महिन्यात घेतली जाईल. यामुळे घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई आणि उपनगरातील घरांच्या किमती गेल्या काही वर्षांत खूप वाढल्या आहेत. त्यामुळे खासगी विकसकांकडून घर घेणे सामान्य नागरिकांसाठी कठीण झाले आहे. याच कारणास्तव अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. मागील वर्षी मुंबई मंडळात ऑक्टोबरमध्ये लॉटरीची अपेक्षा होती परंतु पुरेशी घरे उपलब्ध नसल्यामुळे जाहीर झाली नाही.
advertisement
फेब्रुवारीमध्ये लॉटरी जाहिरात केल्यानंतर खासगी विकसकांकडून मिळणारी 15 ते 20 टक्के घरे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश असेल. ठाणे आणि कल्याण परिसरातील घरांना खूप मागणी आहे. 2025 मध्ये 5 हजार घरांसाठी 1.5 लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीही लॉटरीला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
