एकता सावंतच्या संघर्षाला राज ठाकरेंचा मिळाला पाठिंबा
डोंबिवलीत एकता सावंत ही एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. तिच्या इंस्टाग्रामवर 51 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिची व्हिडिओज लाखो वेळा पाहिली जातात. मात्र तिच्या स्टॉलवर महापालिकेकडून सतत कारवाई होत होती तर इतर फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी असल्याचा तिला आरोप आहे. एकता सावंत म्हणते की,''माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेतला तरी कारवाई केली जाते'' आणि याबाबत तिने खंत व्यक्त केली.
advertisement
डोंबिवलीत मनसेचं वादळ आलं
याबाबत तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर थेट राज ठाकरे यांनी ही गोष्ट पाहिली. त्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि महापालिकेच्या भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जाधव म्हणाले की, डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांना अधिकारी पाठीशी आहेत मात्र मराठी फेरीवाल्यावर सतत कारवाई होत आहे जे अन्याय आहे.
View this post on Instagram
मनसेचे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांमध्ये घाबरलेले वातावरण पाहायला मिळाले. त्यांनी स्पष्ट केले की व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणींच्या पाठीशी मनसे आहे. या घटनेमुळे स्थानिक समाजातही चर्चा सुरू झाली असून लोक एकता सावंतच्या बाजूने उभे आहेत.
एकता सावंतने दाखवलेल्या धाडसामुळे आणि सोशल मीडियावर असलेल्या तिच्या लोकप्रियतेमुळे तिला मोठा पाठिंबा मिळत आहे. मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या पाठिंब्याला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे डोंबिवलीत स्थानिक फेरीवाल्यांच्या हक्कांबाबत चर्चा अधिक वाढली आहे.
