डीसी टू एसीच्या बदलानंतर, 12 डब्ब्यांनंतर 15 डब्ब्यांच्या लोकलनंतर आता रेल्वे स्थानकातही बदल होणार आहे. लवकरच 12 डब्ब्यानंतर 15 डब्ब्यांच्या लोकल रूळावर धावणार आहेत. त्यासाठी रेल्वे फलाटाची रुंदी वाढवली जात आहे. लोकलमध्ये 'डीसी टू एसी' बदल झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकांचाही कायापालट करण्यात येणार आहे. सर्वाधिक उत्पन्न देणार्या स्थानकांमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकाचाही समावेश होतो. यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाला अद्ययावतीकरण (Update) केलं जाणार आहे.
advertisement
70 सीटचे मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉलची उभारणी केली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर, याच धर्तीवर इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचाही कायपालट करण्याचा रेल्वेचा मानस आहे. मध्य रेल्वेवर कल्याण, ठाणे आणि दादर येथे सर्वाधिक गर्दी असली तरी, रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न हे डोंबिवली स्थानकातून मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजूबाजूच्या भागातील प्रवासी मासिक पास काढण्यासाठी तसेच कोपरापर्यंतच्या प्रवासासाठी डोंबिवली स्थानकाला पसंती देतात. दररोज तिकीट काढून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यामुळे हे स्थानक मागील अनेक वर्षांपासून रेल्वेच्या उत्पन्नात अग्रेसर राहिले आहे.
कमी जागा असल्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी होते. पण आता लवकरच डोंबिवली रेल्वे स्थानकाची परिस्थिती बदलणार आहे. मध्य रेल्वेकडून डोंबिवली स्थानकाची 'मॉडर्न स्थानक' म्हणून निवड केली असून, या अद्ययावतीकरण प्रकल्पात अनेक बदल केले जाणार आहेत. यामध्ये, तीन पादचारी पुलांची रूंदी, शिवाय नव्याने एक पुल उभारला जाणार आहे, सर्वच पुलांची एकमेकांसोबतची कनेक्टिव्हिटी, 70 सीट्सचे मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉलचा समावेश असणार आहे. टिकिट बुकिंगसह इतरत्र महत्त्वाचे ऑफिसेसही पहिल्या मजल्यावर असतील.
