स्थानिक नागरिक आणि वाहनचालक या निर्णयावर संताप व्यक्त करत आहेत. नेरळ येथील वाहतुकीचा खोळंबा आणि पर्यायी रस्त्यांची खराब स्थिती लक्षात घेता प्रवाशांना दामत रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट असा मोठा वळसा घालावा लागणार आहे. विशेष म्हणजे या पर्यायी मार्गांवर सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी तयार होण्याची शक्यता आहे.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून नेरळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. वारंवार रेल्वे गेटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने स्थानिकांचा संताप अधिक वाढलेला आहे. नागरिक आता रेल्वे प्रशासनाकडून फाटकाचे काम लवकर पूर्ण करावे आणि उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करत आहेत.
या दिवशी राहणार बंद
6 ते9 जानेवारीदरम्यान सकाळी 8 वाजेपर्यंत या फाटकावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही. या निर्णयामुळे नेरळकरांवर आणि प्रवाशांवर मोठा ताण पडला आहे.शिवाय सध्या सलग चार दिवस फाटक बंद राहणार असल्यामुळे स्थानिकांचे दैनंदिन नियोजन कोलमडणार आहे. प्रशासनाने पर्यायी मार्गांची परिस्थिती पाहून आधी नियोजन केले असते तर समस्या इतकी गंभीर होणार नाही होती.
