सुरुवातीस परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेणे आवश्यक होते. ज्याला आयडीपी असे म्हणतं.
ज्याला आयडीपी असे म्हणतात. मात्र आता हा परवाना अनेक देशांमध्ये वाहन चालवण्याची परवानगी देतो. भारतात तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असताना आंतरराष्ट्रीय परवाना घेऊ शकता, ज्यामुळे तुम्ही अनेक परदेशी देशांमध्ये कायदेशीररीत्या वाहन चालवू शकता.
परंतु प्रत्येक देशात नियम हे वेगळे असतात. काही ठिकाणी फक्त भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसा असतो तर काही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट आवश्यक असते. म्हणून, परदेशात गाडी चालवण्यापूर्वी त्या देशाचे वाहतूक नियम नीट जाणून घेणे आणि गरज भासल्यास आयडीपी मिळवणे खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
कसा करु शकता अर्ज?
भारतात आयडीपी मिळवण्यासाठी तुम्ही नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया वापरून ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकता. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, पासपोर्ट आणि काही ठिकाणी छायाचित्र असते. सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने सादर केली असतील, तर तुम्हाला एक वर्षासाठी वैध असलेला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकतो.
हा परवाना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे आणि तुमच्या भारतीय लायसन्सला परदेशात कायदेशीर ओळख देतो. आयडीपीमुळे तुम्ही परदेशात वाहन चालवू शकता आणि कार भाड्याने घेणेही सहज होते
