नेमके घडले तरी काय?
कल्याण पूर्वच्या मलंगगड रोड परिसरातील ही घटना आहे. जिथे गेल्या 16 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री उशिरा ट्रक चालकांना एक तरुण कोयत्याचा धाक दाखवत दहशत पसरवत होता, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. हातात कोयता घेऊन रस्त्यावरुन जाणाऱ्या आणि तिथे उभ्या असलेल्या वाहन चालकांमध्ये भिती पसरवत होता.
advertisement
काही वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. पोलिस तपासाच्या दरम्यान तो व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली असून त्याचे नाव मुमताज रवाबअली खान आहे आणि तो कल्याण पूर्वतच राहत असल्याचे पोलिसांना समजले. मग काय पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करुन त्याची धिंड काढत त्याला त्याच रस्त्यावरून नेले जिथे त्याने कोयता नाचवत दहशत निर्माण केली होती.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही केली आहे. घडलेल्या घटने प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 822/2025, भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 126(2), भारतीय हत्यार कायदा 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) आणि 135 तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
