अंबरनाथमधील मतदार यादीमधील गोंधळावरून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी वर्गला धारेवर घेतलं होतं आणि निवडणूक रद्द करावी, अशी मागणी केली होती. यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या यातच आता कल्याण पश्चिमेतील मतदार यादीत मोठ्या संख्येनं दुबार मतदार, यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका. आवश्यक पडल्यास निवडणुका पुढे ढकला अशी मागणी पत्रकार परिषद घेत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
advertisement
'ठाकरे बंधू पाठोपाठ आता भाजपने सुद्धा मतदार यादीतील घोळावर आवाज उठवला आहे. मतदार यादी आणि त्यातील दुबार मतदारांचा मुद्दा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील एका पॅनेलमध्ये तब्बल 1800 दुबार मतदार असल्याचं सांगत ही सर्व एका विशिष्ट समाजाचे मतदार आहेत. ते पाहता मतदार यादी बिनचूक होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
तसंच मतदार यादीतील दुबार मतदार काढून ती अद्ययावत करूनही इतक्या मोठ्या संख्येनं दुबार मतदारांची नावे असण्यामागे काही षडयंत्र आहे का? असा संशयही भाजपने व्यक्त केला आहे.
