नेमकं काय घडलं?
शहाड येथे राहणाऱ्या विधवा महिला प्रेमलता धादवड यांची ओळख इगतपुरीतील दिशा उबाळे हिच्याशी झाली होती. दिशाने प्रेमलता यांच्या दोन्ही मुलांना(अजय आणि साहिल)यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. अजय दिव्यांग असल्याने विशेष कोट्यातून त्याची नियुक्ती निश्चित असल्याचेही सांगण्यात आले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या आशेने प्रेमलता यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून बँकांकडून कर्ज घेतले.
advertisement
मार्च 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान गुगल पे आणि विविध बँक खात्यांमार्फत आरोपींना एकूण ६७ लाख २३ हजार ३०० रुपये देण्यात आले. मात्र नियुक्ती पत्राची मागणी होताच आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयात धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याण हादरलं! नोकरीचं आमिष दाखवून विधवा महिलेसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार
