चालत्या कारचा टायर फुटला, एकाच कुटुंबातील...
अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा संबंध कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा येथील कुटुंबाशी आहे. मृतांमध्ये निलेश बुकाणे, त्यांची सख्खी बहीण वैशाली सचिन घुसळे आणि निलेश बुकाणे यांच्या पत्नी छाया बुकाणे यांचा समावेश आहे.अपघातात अनेक जखमी झाले आहेत ज्यात लहान मुलेही आहेत
मिळालेल्या माहितीनुसार कारचा टायर फुटल्यामुळे चालकावर नियंत्रण गमावले आणि ही घटना घडली. घटना घडल्यानंत स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात बुकाणे आणि घुसळे कुटुंबीय आनंदात दिसत होते. या अपघातामुळे त्या आनंदाच्या क्षणांमध्ये काही क्षणांतच दुःख आणि हाहाकार पसरला आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांवर या घटनेने मोठा धक्का बसला आहे.
advertisement
