नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमुळे भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाल्याचे चित्र होचे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावला आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले. भाजपात आपापल्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देण्यावरुन शिवसेना आणि भाजपातील वितुष्ट शिगेला पोहोचले. एवढच नाही तर हे प्रकरण दिल्लीला अमित शहांच्या दरबारी देखील पोहचल्याची चर्चा होती. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी या वादावर पडदा पडल्याचे समोर आले.
advertisement
नेमकं काय घडलं?
फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाच्या नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्या दरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच स्टेजवर आले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी रविंद्र चव्हाणांचे स्वागत केले आणि नमस्कार करत हस्तांदोलन केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
तर रविंद्र चव्हाण यांनी भाषण करताना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे असा उल्लेख केला. रविंद्र चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सतत महायुतीचा उल्लेख केला. महायुती म्हणून विकास कामे केलीयेत पुढे करणार असून एकविचाराचे सरकार असले की सर्व विकास कामे होतात. महायुतीचे सरकार म्हणून मी या आजच्या कामांबाबत सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पार पडत आहेत. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाल्या त्यानंतर या कल्याण डोंबिवलीत निधी मिळू लागला आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर सर्वात जास्त निधी माझ्या मतदारसंघात आल्याचे देखील श्रीकांत शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :
