नेमकं घडलं काय होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीच्या रात्री कल्याणमधील वालधुनी पुलाखाली एक अनोळखी महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला.
advertisement
तपासादरम्यान ही महिला रूपाली गांगुर्डे (वय 35) असल्याचे समजून आले झाले. रूपालीचे पती विलास गांगुर्डे यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी रूपालीने अर्ज केला होता. मात्र या निर्णयावरून सासू लताबाई आणि रूपाली यांच्यात वारंवार वाद होत होते.
धक्कादायक कारण आले समोर
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नोकरीमुळे आर्थिक लाभ रूपालीला मिळू नये यामुळे लताबाईने आपल्या मित्र जगदीश म्हात्रे याच्या मदतीने कट रचला. ठरलेल्या योजनेनुसार दोघांनी मिळून रूपालीला वालधुनी पुलाजवळ नेले आणि तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला पुलाखाली टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.
