मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना भिवंडील गोवंडी परिसरातील आहे. जिथे 2018 ला लग्न झाल्यानंतर ओरीपी फकरुद्दीन इब्राहिम शेख(वय36) आणि पीडित महिला दोघंही वास्तव्यास होती. त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यांतर त्यांच्याच वारंवार क्षुल्लक कारणावरुन खटके उडत होते.
2025 मध्ये महिलेला मुलगा झाला मात्र मुलगा झाल्यानंतर सर्व खर्च वाढला. दररोज होत असलेल्या अति खर्चामुळे पतीने पत्नीला मारहाण केली यावरच तो थांबला नाही तर त्याने तिला घरातून हाकलूनही दिले. या प्रकरणी पीडित महिलेने भिवंडीतील भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
भिवंडीतल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे मोठा खळबळ उडाली आहे. स्थानिक समाजसेवकांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. पोलीसही याप्रकरणी महिला आणि बाल कल्याण समितीशी संपर्क साधून पीडितेला संरक्षण देण्याची तयारी करत आहेत.
