'तो' एक निर्णय ठरला बाळाच्या जीवाशी
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून चिमुकल्याचे कुटुंब कामाच्या शोधात कल्याण स्टेशनवर आले होते. पण काम किंवा राहण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांनी आपली 3 मुलं घेऊन पादचारी पुलावर रात्री झोपण्याचा निर्णय घेतला. नीलेश कुंचे आणि त्यांची पत्नी पूनम पोंगरे अशी अपहरण झालेल्या आई-वडिलांची नाव आहेत.
अर्ध्या रात्रीच्या सन्नाट्यात घडला गुन्हा
advertisement
साधारण 4 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने पुलावर येऊन झोपलेल्या कुटुंबाकडे नजर टाकली. मग योग्य संधी साधत त्याने झोपलेल्या तीन मुलांपैकी सर्वात लहान म्हणजे अवघ्या 8 महिन्याचे बाळ हताशपणे उचलले आणि सिंडीकेट परिसराकडे निघून गेला. सकाळी 6 वाजता जाग आली तेव्हा बाळ गायब होते. काही क्षणांतच पालकांना मोठा धक्का बसला.
नीलेश आणि पूनम पोंगरे तातडीने बाळ शोधायला सुरुवात केली, पण तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर घाबरलेल्या पालकांनी लगेच कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गेले. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन, रेल्वे पोलिसांसोबत महात्मा फुले पोलिसांनीही तत्काळ तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली.
अखेर आडकले पोलिसांच्या जाळ्यात...
तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, अवघ्या 6 तासांतच पोलिसांनी सिंडीकेट परिसरातून आरोपी अक्षय खरे याला ताब्यात घेतले. तपासात समोर आले की, अक्षयसोबत त्याची आत्या सविता खरे यालाही बाळ अपहरणात सहभाग होता. प्राथमिक तपासानुसार, बाळाला विकण्याच्या उद्देशाने ही चोरी केल्याचा संशय आहे, परंतु नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.
