डॉक्टर बाहेर गेले अन् घरात अन्..
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. डॉक्टर गांधी घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची खात्री करून घरात प्रवेश केला. दरवाज्याचे कुलूप तोडून चोर घरात घुसले आणि थेट तिजोरीवर हात साफ केला.
चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या असा मौल्यवान ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत सागंण्यात आले आहे. चोरीनंतर घरी परतल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने चोरी झाल्याचे उघड झाले.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घर बंद ठेवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
