समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात ही घटना घडली आहे. दोन वर्षांची वेदा विकास काजारे ही चालत असताना एका भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर मागून हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकली वेदा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
व्हिडिओमध्ये दिसते की, चिमुकली भावाच्या हाताला धरून जात होती. अचानक मागून कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खाली पाडले, कुत्र्याने तिच्या पोटावर, पाठीवर चावा घेतला आहे. तिच्या मानेवरही कुत्र्याने हल्ला केला. चिमुकली जीव वाचवण्यासाठी तडफडत होती. पण आसपास कोणी नसल्याने तिचे हाल झाले आहे.चिमुकली वेदनेने कळवळत होती.
लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून प्रशासन याकडे लक्ष देणार कां सवाल उपस्थिती केला जतोय.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू, असा इशारा अॅड. रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
