शाळेऐवजी गेम झोनमध्ये मुलं
सर्व समोर आलेला प्रकार हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील आहे . जिथे अभ्यासाच्या नावाखाली घरातून बाहेर पडणारी अल्पवयीन मुले-मुली प्रत्यक्षात शाळा आणि क्लास बुडवून गेम झोनमध्ये तासन् तास खेळ खेळत बसलेली आढळली. पोलसांनी केलेल्या छाप्यामुळे हा प्रकार सर्वांच्या समोर आलेला आहे.
धक्कादायक म्हणजे चक्क काही मुलं- मुली धूम्रपान, बीअर हातात घेऊन फिरताना दिसले यामुळे पोलिसही थक्क झाले. पालकांना आपल्या मुलांचे आयुष्य अशा प्रकारे चालले आहे याची कल्पनाही नव्हती.
advertisement
कोळसेवाडी पोलिसांना स्थानिकांकडून या बेकायदेशीर गेम झोनची माहिती मिळताच कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल होंडे यांनी तातडीने छाप्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन धाड टाकली. कोणतीही परवानगी नाही त्यात सुरक्षा यंत्रणा नाही, अग्निशमन साधनांची तर पुसटशी कल्पनाही नाही. अंधारात बसवलेल्या मशीनवर शेकडो मुलं-मुली बेभान गेम खेळताना दिसली.
